9/11 20th Anniversary : महासत्तेला सुरुंग लावणारा 9/11 चा दहशतवादी हल्ला
अमेरिकेवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली. 11 सप्टेंबर हा दिवस अमेरिकेतील लोक कधीही विसरू शकणार नाहीत.(photo by getty images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती, ज्या अमेरिकेच्या वैभवाची साक्ष होत्या, त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. (photo by getty images)
या दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेवर इतका मोठा हल्ला हा जगातील अनेक देशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा होता. (photo by getty images)
या हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं आणि जगाच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं.(photo by getty images)
या दहशतवाही हल्ल्यामागे अल कायदाच्या ओसामा बिन लादेनचा हात होता. अल कायदाने दोन विमानं हायजॅक करुन ट्विन टॉवरवर एका मागोमाग एक अशी धडकवली होती.(photo by getty images)
अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन तालिबानी शासन व्यवस्था उलथवून टाकली. पण यामध्ये ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या हाताला काही लागला नाही. (photo by getty images)
तब्बल दहा वर्षांनी अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा ठिकाणा सापडला. लादेन पाकिस्तानमध्ये अबोटाबाद येथे लपून बसला होता. अमेरिकन लष्कराने एका सीक्रेट मिशनच्या माध्यमातून लादेनला पाकिस्तानात जाऊन ठेचलं. (photo by getty images)