World: 'या' देशांत कर्मचाऱ्यांना मिळतो सर्वाधिक पगार; इथे जाऊन तुम्हीही होऊ शकता मालामाल!
जगात सर्वाधिक उत्पन्न मोनॅको या देशात मिळते. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही, ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती आणि खेळाडू देखील स्थायिक झाले आहेत. मोनॅको या देशात एकही गरीब व्यक्ती नाही, इथे राहणारे सर्व करोडपती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत लोक या देशात राहतात. येथे सरासरी वार्षिक पगार सुमारे 72 लाख रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रिया हा मध्य युरोपातील एक छोटासा देश आहे. उत्तम जीवन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक चांगला देश आहे. ऑस्ट्रियातील कर्मचाऱ्यांचा सरासरी पगारही खूप जास्त आहे. येथे सरासरी वार्षिक पगार सुमारे 50 हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे 36 लाख रुपये आहे.
नॉर्वे हा देश विशेषत: त्याच्या नैसर्गिक देखाव्यांसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे आपल्या कर्मचार्यांना सर्वाधिक पगार देण्यासाठी देखील हा देश ओळखला जातो. या देशात वार्षिक पगार $51,000, म्हणजेच सुमारे 37 लाख रुपये आहे.
युरोपमध्ये असलेल्या बेल्जियम देशातील कर्मचाऱ्यांचा पगारही खूप जास्त आहे. येथील कर्मचाऱ्यांचा सरासरी वार्षिक पगार 52 हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे 38 लाख रुपये आहे.
सुंदर समुद्रकिनारे आणि विषारी सापांसाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलिया हा देष आर्थिक शक्तीस्थान देखील आहे. या देशातील कर्मचाऱ्यांचा सरासरी वार्षिक पगार 53 हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे 39 लाख रुपये आहे.
युरोपमध्ये असलेल्या नेदरलँड्समध्ये सरासरी वार्षिक पगार 54 हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे 40 लाख रुपये आहे. या देशाची राजधानी अॅमस्टरडॅम ही जगामध्ये ग्लोबल सिटी म्हणून ओळखले जाते.
लक्झेंबर्ग हा पश्चिम युरोपमधील एक छोटासा देश आहे. येथे कर्मचाऱ्यांना सरासरी 65 हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे 48 लाख रुपये वार्षिक वेतन मिळते.