Queen Elizabeth II Funeral : आज महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार...
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांचं पार्थिव लंडनमधील (London) किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल (PHOTO : ANI)
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) देखील उपस्थित राहणार आहेत (PHOTO : ANI)
राष्ट्रपती सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर हॉलला (Westminster Hall) भेट देत महाराणींचं अंत्यदर्शन घेतलं (PHOTO : ANI)
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
नंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव 13 सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्ये दाखल झालं. (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला (Westminster Hall) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. (PHOTO : ANI)
त्यांच्यावर आज 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रात्री 12 वाजता शाही कुटुंब महाराणीला कायमचा निरोप देईल आणि महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येईल. (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
यादरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, प्रतिनिधी लंडनला पोहोचले आहेत. रविवारीच महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक जमले होते. ही गर्दी आज आणखी वाढू शकते. (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)
मीडिया रिपोर्टनुसार, महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यदर्शनासाठी आठ किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली आहे. यामध्ये दर तासाला सुमारे 4000 लोक राणीचे अंतिम दर्शन घेत आहेत (PHOTO TWEETED BY @RoyalFamily)