PM Modi US Visit : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची मोदींनी घेतली भेट, आज राष्ट्रपती जो बायडन यांना भेटणार

Continues below advertisement

Feature_Photo_4

Continues below advertisement
1/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेतली. (Photo tweeted by @PMOIndia)
2/7
पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. (Photo tweeted by @PMOIndia)
3/7
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. (Photo tweeted by @PMOIndia)
4/7
पाकिस्तान दहशतवाद्यांचं माहेरघर आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी चिंता व्यक्त केली. तसेच भारतातील लसीकरण मोहीमेचंही त्यांनी कौतुक केलं. (Photo tweeted by @PMOIndia)
5/7
पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. (Photo tweeted by @PMOIndia)
Continues below advertisement
6/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल. (Photo tweeted by @PMOIndia)
7/7
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. (Photo tweeted by @PMOIndia)
Sponsored Links by Taboola