Photo : Elon Musk यांच्या छोट्याशा 'फोल्डेबल बॉक्स' घरात दडलंय काय? जाणून घ्या
जगातली दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क हे भाड्याच्या एका बॉक्स टाईप घरात राहतात. हे घर अगदीच छोटंसं आहे. (photo courtesy :Jorge Ramirez)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ 50 हजार डॉलर्स किंमतीचे हे घर बॉक्सबल या कंपनीची निर्मिती असून ते कॅसिटा मॉडेलचे आहे. (photo courtesy : Boxabl)
महत्वाचं म्हणजे ते फोल्डेबल घर आहे. फोल्ड केल्यानंतर ते एखाद्या ट्रकच्या मदतीने दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी घेऊन जाता येतं आणि त्या ठिकाणी बसवता येतं. (photo courtesy : Boxabl)
माझ्या या सुंदर घराची किंमत 50 हजार डॉलर्स असून हे घर मी स्पेस एक्सकडून भाड्यानं घेतलं आहे असं इलॉन मस्क यांनी सांगितलंय. (photo courtesy : Boxabl)
हे घर केवळ 375 स्क्वेअर फूट जागा व्यापतं. यामध्ये बाथरुम, लिव्हिंग रुम आणि बेडरुमची सोय आहे. किचन आणि बेडरुम हे कनेक्टेड आहेत. (photo courtesy : Boxabl)
बाथरुम हे किचनला लागून असून त्यामध्ये बाथ टब, काऊंटर टॉप, सिंक, मिरर आणि स्लायडिंग डोअरची सोय आहे. (photo courtesy : Boxabl)
महत्वाचं म्हणजे हे घर जरी फोल्डेबल असलं तरी ते वादळ किंवा पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मजबूत आहे. या नैसर्गिक आपत्तींचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. (photo courtesy : Boxabl)