कुठलाही हवाईहल्ला क्षणार्धात नष्ट करण्याची ताकद; भारताचं सुदर्शन चक्र S-400ची वैशिष्ट्ये काय?
भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव दिले आहे, तर हे सुदर्शन चक्र शत्रूचा नेमकं कसा सफाया करते आणि त्यांची खास वैशिष्ट्य काय? या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Operation Sindoor
1/8
भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. हे काम भारताच्या सर्वात मजबूत हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने केले आहे.
2/8
ही अशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हल्ला होताच सक्रिय होते आणि शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र त्वरित नष्ट करते. भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव आहे.
3/8
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.
4/8
ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.
5/8
यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.
6/8
सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते.यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो
7/8
ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
8/8
हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली ही कोणत्याही देशासाठी एक संरक्षण कवच असते. ज्याच्या मदतीने शत्रू देशाकडून येणारे रॉकेट, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन प्रथम शोधून ओळखले जाते.
Published at : 08 May 2025 07:03 PM (IST)