DART Mission : पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाचं 'डार्ट मिशन', लघुग्रहावर धडकलं अंतराळयान
अमेरिकन अंतराळसंस्था नासाची ही मोहीम यशस्वी झाल्याने आता भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह नष्ट करता येतील किंवा त्यांची दिशा बदलता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडायमॅारफस (Dimorphos) नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर घडवली आहे.
पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासानं (NASA) आज एक मोठी मोहिम फत्ते केली आहे.
थ्वीला ॲस्ट्रॅायडच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नासानं 'डार्ट मिशन' (DART Mission) यशस्वीरित्या राबवलं आहे. या मिशन अंतर्गत नासाचं डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट (Double Asteroid Redirection Test) उल्केवर आदळलं आहे.
हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता. अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे नासाचं हे मिशन फार महत्त्वाचं होतं आणि ते यशस्वी झालं आहे.
नासाने आज पहाटे ही मोहीम यशस्वी केली.
भारतीय वेळेनुसार, 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 4.45 वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॅारफस (Dimorphos) ॲस्ट्रॅायडसोबत टक्कर झाली. यामध्ये नासाचं अंतराळयान नष्ट झालं आहे. पण ॲस्ट्रॅायडचा वेग आणि कक्षा बदलण्यात नासाला यश आलं आहे. नासानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.