स्कॉटलंडमध्ये ट्रस यांनी घेतली राणी एलिझाबेथ यांची भेट, औपचारिकपणे पंतप्रधानपदी झाली नियुक्ती
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth ll) यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूक निकालांमध्ये लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला.
निवडणूक निकालात लिझ ट्रस (Liz Truss) यांना 81,326 आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना 60,399 मते मिळाली.
ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या औपचारिक प्रक्रियेचा भाग म्हणून लिझ ट्रस यांनी सोमवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅस्टल येथे राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.
राणी एलिझाबेथ यांनी औपचारिकपणे ट्रस यांना नवीन सरकार स्थापन करण्यास सांगितले आहे.
आजच माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला राजीनामा राणींकडे सुपूर्द केला.
96 वर्षीय राणी एलिझाबेथ आपल्या वार्षिक सुट्टीसाठी अॅबर्डीनशायरच्या (Aberdeenshire) निवासस्थानी आहेत. यामुळेच लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसऐवजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅस्टलमध्ये ट्रस यांनी राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.
बालमोरल कॅस्टल येथे राणीची भेट घेऊन नवीन पंतप्रधान लिझ ट्रस लंडनला परतल्या आहेत.
ट्रस लंडनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे पंतप्रधान म्हणून आपले पहिले भाषण देतील आणि त्यानंतर काही प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांची नावे जाहीर करतील.
लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांनी ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. हे दोन्ही नेतेही कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे होते.