Wolf Man : एकेकाची हौसच न्यारी, लांडग्यासारखा दिसतोय भारी, खर्च तर...

Man look Like Wolf : आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले.

Man look Like Wolf

1/9
काही लोकांचे छंद विचित्र असतात. पण लोकांचे छंद इतके महागडे असतात, की ऐकून एखाद्या सर्वसामान्य माणसाला धडकी भरेल. असाच एक प्रकार जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे. (PC : zeppet_jp)
2/9
आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले. (PC : zeppet_jp)
3/9
या तरुणाने फक्त लांडगासारखा दिसण्यासाठी एवढा खर्च केला आहे. या तरुणाने हुबेहुब लांडग्यासारखा दिसण्यासाठी महागडा सूट बनवून घेतला आहे. (PC : zeppet_jp)
4/9
या व्यक्तीने सूट बनवण्यासाठी झेपेट कंपनीशी संपर्क साधला आणि एक अल्ट्रा रिॲलिस्टिक वॉल्फ सूट तयार करून घेतला. (PC : zeppet_jp)
5/9
या जपानमधील तरुणाने झेपेट कंपनीकडून 3,000,000 येन म्हणजे 18.5 लाख रुपये खर्च करून महागडा सूट तयार करुन घेतला आहे. (PC : zeppet_jp)
6/9
या तरुणाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड आहे. मी लहानपणी प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. मी खूप पूर्वी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखे दिसले पाहिजे. मला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे.' (PC : zeppet_jp)
7/9
हा सूट तयार करण्यासाठी सुमारे 50 दिवस लागले. हा लांडग्याचा सूट पाहून तरुण खूप खूश झाला. तो कंपनीच्या कामावर खूप प्रभावित झाला. (PC : zeppet_jp)
8/9
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती जपानमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने आपली ओळख लपवली आहे. (PC : zeppet_jp)
9/9
या व्यक्तीने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे. (PC : zeppet_jp)
Sponsored Links by Taboola