Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय आंबे- डाळिंबांची अमेरिकेत होणार विक्री!
भारतातील आंबा (mangoes) आणि डाळिंबाची (Pomegranate) आता अमेरिकेत निर्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या कृषी विभागाने या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातील आंबे उपलब्ध होणार आहेत. भारतीय कृषी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
भारतातून या आधीही अमेरिकेला आंब्याची निर्यात होत होती. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते.
त्यामुळे अमेरिकेच्या कृषी विभाच्या निरीक्षकांना विकिरण सुविधेच्या तपासणीसाठी भारतात येता येत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय आंब्याच्या निर्यातीवर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आले होते.
परंतु, 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार धोरण मंचाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये भारतातील आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात करण्यास मंजूरी देण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली.
भारतातील आंबे आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात होईल तर अमेरिकेची चेरी व अल्फाल्फा गवताची भारतात आयात होणार आहे.
येत्या मार्च महिन्यापासून भारतातील हापूस आंब्याची निर्यात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या आंबा उत्पादक पट्ट्यातील आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
23 नोव्हेंबर 2021 रोजी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार धोरण मंचाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये भारतातील आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात करण्यास मंजूरी देण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली.