Helicopter Crash In US: हेलिकॉप्टर नदीत कोसळले, सीमेन्स कंपनीच्या सीईओंसह सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश

Helicopter Crash In US: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Helicopter Crash In US

1/7
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.
2/7
सदर घटनेत सीमेन्स कंपनीच्या सीईओंसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे.
3/7
न्यूयॉर्कच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, सदर हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्स कंपनीचे होते.
4/7
अमेरिकेतील एका हेलिकॉप्टर पॅडवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीच्या उत्तरेकडे निघाले होते.
5/7
हेलिकॉप्टर जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा ते दक्षिणेकडे वळले आणि काही मिनिटांनी अपघात होऊन नदीत कोसळले.
6/7
सदर घटनेनंतर आपत्कालीन सेवा आणि पोलिसांच्या बोटी तातडीने परिसरात पोहोचल्या आणि पाण्यात शोध मोहीम सुरू केली.
7/7
अपघातानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Sponsored Links by Taboola