PHOTO: जर्मनीतही गणेशोत्सवाचा उत्साह! लेझीम, ढोल ताशाच्या गजर अन् भव्य मिरवणूक
गणेशोत्सव फक्त राज्यात देशात नाही तर अगदी सातासमुद्रापार सुद्धा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत राहून सुद्धा गणेशोत्सव सारखा मराठी सण अगदी उत्साहात साजरा करता यावा यासाठी 2016 पासून हा प्रयत्न केला जातोय
अगदी महाराष्ट्रत ज्या उत्साहात ढोल-ताशा वाजवत, लेझीम खेळत बाप्पाची मिरवणूक काढून हा बाप्पा विराजमान केला जातो
अगदी तशाच प्रकारे जर्मनीत राहून या मंडळाने गणराज विराजमान केलाय . या गणेशोत्सवात फक्त महाराष्ट्र किंवा भारतीय नागरिक नाही तर जर्मनीतील स्थानिक सुद्धा उत्सुकतेपोटी आणि हा उत्साह पाहून सहभागी झाले आहेत
या मंडळात रोज 500 ते 1000 पेक्षा अधिक महाराष्ट्रीयन त्यासोबतच जर्मनमधील स्थानिक या मंडळात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत
म्युनिक शहराचा मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओडियनस्प्लाज या भागात मुख्य मिरवणूक निघाली होती.
अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत जर्मनीत राहून सुद्धा ढोल ताशा वाजवत 'रमणबाग ढोल ताशा पथक' वाजत गाजत या उत्सवाच्या निमित्ताने आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे
परदेशात राहून सुद्धा आपल्या मराठी माणसाला गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी आमचं मंडळ याचा आयोजन करतं.
बाप्पा विराजमन झाल्यावर पारंपरिक पद्धतीने पूजा आरती होते. त्याशिवाय संस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आयोजित करतो, त्यामुळे आमच्या सोबत जर्मन मधील स्थानिक सुद्धा या उत्सवात सहभागी होतात.
त्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, असं मंडळाच्या वतीने विपुला घोसाळकर यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना सांगितलं