Donald Trump : एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात प्रार्थना, H-1 बी व्हिसा महाग करत भारताला आणखी एक धक्का

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाचं शुल्क वाढवलं आहे. व्हिसासाठी आता 88 लाख रुपये शुल्क भरावं लागणारआहे.

Continues below advertisement

डोनाल्ड ट्रम्प

Continues below advertisement
1/7
अजय धनजे, एबीपी माझा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी ज्या भारतात होम हवन झालं, नमस्ते ट्र्म्प सारखे भव्य दिव्य कार्यक्रम झाले त्याच भारताला ट्रम्प यांनी आज दुसरा मोठा धक्का दिला आहे.
2/7
भारतावर 50% टॅरिफ लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता H-1 बी व्हिसा एवढा महाग केला आहे कुठल्याही गरीब, मध्यमवर्गीय तरुणाला अमेरिकेत नोकरी मिळणार नाही.
3/7
H-1 बी व्हिसा आहे का? गणित, आयटी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना परदेशी कामगार नियुक्त करण्यासाठी व्हिसा देण्याची परवानगी असते, या व्हिसाला H-1 बी व्हिसा म्हणतात. पूर्वी या व्हिसासाठी कंपनीला फक्त 1 हजार डॉलर म्हणजे 88 हजार रुपये मोजावे लागायचे आणि ते कमी खर्चात चांगले भारतीय कामगार नेमायचे मात्र आता ट्रम्प सरकारने H-1 बी व्हिसाची किंमत 1 लाख डॉलर केली आहे. भारतीय चलनात त्याचं मूल्य 88 लाख रुपये होतं.
4/7
अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या एकूण H-1 बी व्हिसापैकी 71% व्हिसा भारतीयांना देण्यात येत होता मात्र आता ट्रम्प यांनी H-1 बी व्हिसा एवढा महाग केला आहे की भारतीय कामगार नियुक्त करणं कुठल्याच कंपनीला परवडणार नाही. डोनाल्ड ट्रम्प या निर्णयातून अमेरिकेतील स्थानिक तरुणांना रोजागारामध्ये प्राधान्य देत आहेत. मात्र याचा मोठा फटका भारताला होणार आहे.
5/7
भारताचे काय नुकसान? : H-1 बी व्हिसामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय तरुणांना अमेरिकेत नोकऱ्या मिळायच्या. सुंदर पिचाई सारख्या अनेक कंपन्यांच्या सीईओंची सुरूवात याच H-1 बी व्हिसावर अमेरिकेत गेल्यानं झाली. पुढे ते एवढे मोठ्या पदांवर गेले की हजारो भारतीय तरुणांना त्यांनी परदेशात कामाची संधी दिली.
Continues below advertisement
6/7
भारतात येणाऱ्या परकीय चलणावरही H-1 बी व्हिसाचा मोठा परिणाम होणार आहे, कारण भारतातून अमेरिकेत काम करणाऱ्यांची संख्या 80 लाख पेक्षा जास्त आहे जे तिथे कमाई केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा काही भाग डॉलरच्या रुपाने मायदेशी म्हणजे भारतात पाठवतात, मात्र आता तरुणांना जर अमेरिकेत नोकरीची संधी कमी होणार असेल तर मग भारतात येणाऱ्या डॉलर्स मध्येही घट होईल.
7/7
भारताच्या आयटी सेक्टरवरही याचा परिणाम होण्याची शक्यता, अमेरिकेत छोट्या कंपनीत काम करून पैसा कमावल्यानंतर अनेक तरुण मायदेशी येऊन आपलं स्व:तच काही तरी स्टार्टअप करण्याचा विचार करतात, तुम्ही स्वदेस किंवा शिवाजी द बॉस या चित्रपटात पाहिल्याप्रमाणे अनेक तरुण मायदेशासाठी प्रयत्न करतात मात्र आता असा संधी कमी झाल्यामुळे नावीन्यपूर्ण विकासावरही परिमाण होण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola