Fish Dead in Texas: समुद्रकिनाऱ्यावर लाखो मासे मृत अवस्थेत, नेमकं काय झालं?
येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या माश्यांना पाण्यातून देखील बाहेर काढले नाही किंवा त्यांना विषबाधा देखील झाली नाही तरीही या माश्यांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमान वाढीमुळे या माश्यांचा मृत्यू झाला आहे.
टेक्सासच्या वन्यप्राणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तापमान वाढीमुळे पाणी गरम होते आणि गरम पाण्यात ऑक्सिजन घेण्यास माश्यांना त्रास होतो. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.
मृत पावलेले बरेच मासे हे मॅनहॅडेन या प्रजातीचे आहेत.
सोशल मीडियावर या मृत माश्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
तसेच या फोटोवर सोशल मीडियावर अनेक लोकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, उष्णतेच्या दिवसांमध्ये माश्यांचे मरणे ही खूप साधारण गोष्ट आहे. तसेच समुद्रातील पाण्यापेक्षा किनाऱ्यालगतचे पाणी लवकर गरम होते.
टेक्सासच्या किनाऱ्यालगत 9 जूनपासून हे मृत मासे आढळून येत आहेत.
तसेच प्रशासनाकडून किनाऱ्यालगत स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे.