Cheapest Countries than India : भारतापेक्षा स्वस्त आहेत 'हे' देश, फिरण्यासाठी उत्तम डेस्टिनेशन
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, एक रुपयाची किंमत काही देशांमध्ये भारतापेक्षाही अधिक आहे. असे काही देश आहेत जिथे भारतीय चलन म्हणजे एक रुपयाची किंमत जास्त आहे. जाणून घ्या असे कोणते देश आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडोनेशिया ( Indonesia ) : 1 रुपया = 208 इंडोनेशियाई रुपये इंडोनेशिया हा भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश मानला जातो. या देशात भारतीय एक रुपयाची किंमती 1 रुपया 208 इंडोनेशियन रुपये इतकी आहे.
लाओस ( Laos ) : 1 रुपया = 119 लाओ कीप ( लाओसमधील चलन ) दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या लाओस या देशाच्या चलनाचे नाव लाओ किप आहे. 119 लाओ किप भारताच्या 1 रुपयाएवढी आहे. हा देश बौद्ध मठ, फ्रेंच वास्तुकला, डोंगराळ प्रदेश यासाठी प्रसिद्ध आहे. हा देश हजार हत्तींचा देश म्हणूनही प्रसिद्ध आहे.
व्हेनेझुएला ( Venezuela ) : 1 रुपया = 3,477.5 व्हेनेझुएला बोलिवर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील किनार्यावर वसलेला व्हेनेझुएला देश नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील चलनाचे नाव व्हेनेझुएलन बोलिव्हर आहे. येथे 3,477.5 व्हेनेझुएलन बोलिव्हर 1 भारतीय रुपयाच्या बरोबरीचं आहे.
कंबोडिया ( Cambodia ) : 1 रुपया = 57. 2 कंबोडियन रिएल कंबोडिया देशाला 'किंगडम ऑफ वंडर' म्हणूनही ओळखले जातं. हा देश इतिहास, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कंबोडियाचं चलन कंबोडियन रिएल आहे, जे 57.2 कंबोडियन रिएल ते 1 भारतीय रुपयाच्या बरोबरीचं आहे.
व्हिएतनाम ( Vietnam ) : 1 रुपया = 326 व्हिएतनामी डोंग जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर व्हिएतनाम प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या देशातील सुंदर समुद्रकिनारे, बौद्ध मठ पर्यटकांसाठी आकर्षण आहे. येथील चलनाचे 326 व्हिएतनामी डोंग हे भारताच्या 1 रुपयाएवढं आहे.
हंगेरी ( Hungary ) : 1 रुपया = 4 हंगेरी फोरिंट उत्तम वास्तुकला आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हंगेरीच्या चलनाचं नाव हंगेरियन फॉरिंट आहे. येथे भारताचा 1 रुपया हा 4 हंगेरियन फॉरिंट इतका आहे.
झिम्बाब्वे ( Zimbabwe ) : 1 रुपया = 1.4 झिम्बाब्वे डॉलर झिम्बाब्वे नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीवनासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही व्हाईट रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग आणि वाइल्डलाइफ सफारी यांसारख्या अनेक साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. भारतीय एक रुपयाची किंमत येथील चलन झिम्बाब्वे डॉलरच्या किंमतीत 1.4 झिम्बाब्वे डॉलर आहे.
नेपाळ ( Nepal ) : 1 रुपया = 1.5 नेपाळी रुपया नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे, जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि निसर्गासाठी ओळखला जातो. येथील चलनाचं नाव नेपाळी रुपया आहे. भारतीय 1 रुपया 1.5 नेपाळी रुपयाच्या किमतीचा आहे.
श्रीलंका ( Sri Lanka ) : 1 रुपया = 2.2 श्रीलंकन रुपया उत्कृष्ट समुद्रकिनारे, पाककला आणि हिरवळीसाठी प्रसिद्ध असलेला श्रीलंका देश भारतीयांसाठी स्वस्त आहे. एक भारतीय रुपया 2.2 श्रीलंकन रुपयाच्या बरोबर आहे.