Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये 100 हून अधिक प्रवासी असलेलं विमान कोसळलं, भीषण अपघातात फ्लाईट चक्काचूर
अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात असताना त्याला अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिक माहिती तपासाअंती समजेल.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने चालक दलाने अकताऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. मात्र, यादरम्यान विमानाचा अपघात झाला.
कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ एका प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते.
प्राथमिक माहितीनुसार, अकताऊ शहरात लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं.
अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात होते. यादरम्यान, त्यात काही तांत्रिक बिघाड झाला.
यानंतर विमानाने अकताऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. मात्र, त्यानंतर विमानाचा अपघात झाला.
घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मध्य आशियाई देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील काही जण बचावले आहेत.
कझाकिस्तानच्या मीडियाने आरोग्य मंत्री अकमारल अल्नाझारोवाच्या माहितीनुसार सांगितलं की, एका लहान मुलासह आतापर्यंत 12 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.