Trans Harbour Link: देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं काम 90 टक्के पूर्ण
देशातील सर्वात लांब शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा काम 90 टक्के पूर्ण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appimage 2 देशातील सर्वात लांब 22 किमीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूच्या पॅकेज 2 काम पूर्णत्वास आले आहे.
एमएमआरडीएमार्फत प्रगतीपथावर असलेल्या मुंबई ट्रांस हार्बर लिंक (MTHL) शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पातील समुद्रात बांधण्यात येणाऱ्या टप्पा-२ मधील पुलाच्या डाव्या बाजूच्या गाळ्यात उभारण्यात येणाऱ्या पहिल्या सर्वात जास्त लांब ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकच्या उभारणीचे काम मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज होत आहे
या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची लांबी 180 मीटर आहे तर ज्याची उंची समुद्रापासून 25 मीटर इतकी आहे.
या संपूर्ण प्रकल्पामध्ये 65 मीटर ते 180 मीटर लांबीचे 70 ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात येत आहेत.... यापैकी 36 डेक ची काम पूर्ण झाले आहे.
पॅकेज टू मधील ऑर्थोट्राफिक स्टील डेक उभारण्याचा हा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
संपूर्ण प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.
या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी 5.5 किमी इतकी आहे.
याच प्रकल्पाच्या पॅकेज 2 मध्ये मुंबई खाडी आणि शिवाजीनगर इंटरचेंजमध्ये 7.8 किमी चा पुलाचे काम प्रगतीपथावर आहे..
देशातील सर्वात लांब 22 किमीचा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूच्या पॅकेज 2 काम पूर्णत्वास आले आहे.