IN PICS: वॉशिंग्टन डीसीमध्ये हिवाळी वादळाने हाहाकार; काही भागांमध्ये 14 इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी
सोमवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये जोरदार बर्फाच्छादित हिवाळी वादळ उठले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॉशिंग्टन, डीसी भागातील फेडरल सरकारी कार्यालये आणि शाळा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या कारण या भागात हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला.
हिवाळ्यातील या वादळामुळे अनेक ठिकाणचा वीजसंपर्क तुटलाय.
राष्ट्रीय हवामान सेवेने सोमवारी सकाळी इशारा देताना सांगितले की, एक मोठे हिवाळी वादळ सुरू आहे, बर्फाने झाकलेले आणि निसरडे रस्ते तसेच प्रचंड बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानता यामुळे प्रवास धोकादायक होईल.
हवामान सेवेनुसार वादळामुळे उत्तर व्हर्जिनियाच्या काही भागांमध्ये 14 इंचांपेक्षा जास्त बर्फ पडला, तर वॉशिंग्टनमध्ये आठ इंचांपेक्षा जास्त बर्फ पडला.
सोमवारी दुपारी हे वादळ मेरीलँड, नॉर्दर्न डेलावेअर आणि दक्षिणी न्यू जर्सी मार्गे उत्तरेकडे सरकत होते, जिथे एकूण सहा ते १५ इंच हिमवर्षाव झाला.