Washim Accident: भरधाव पिकअपने बाईक उडवल्या, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू, वाशिममध्ये भीषण अपघात

Washim accident: मालवाहक बोलेरो पिकअप वेगाने कारंजाकडे येत असताना पावर हाऊस जवळ एका दुचाकीला मागून धडक देत अपघात झाला.

Washim accident

1/6
वाशिम जिल्ह्यातील कारंजा – दारव्हा मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.
2/6
मालवाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
3/6
ही घटना कारंजा शहराजवळील पावर हाऊस परिसरात घडली. वाहन दारव्हा मार्गावरून वेगात कारंजाकडे येत होते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला नीट जात असलेल्या एका दुचाकीला या पिकअपने मागून जोरदार धडक दिली.
4/6
या धडकेनंतर चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली.
5/6
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले.
6/6
या अपघाताची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. पोलीस वाहन क्रमांकाच्या आधारे बोलेरो चालकाचा शोध घेत असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Sponsored Links by Taboola