Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News: वर्ध्याच्या कासरखेडामध्ये शेतकऱ्याच्या मुलाने बनवलं हायटेक मचाण
शेतात सुरक्षा करण्यासाठी बांधण्यात येणारं मचाण देखील इतकं आलिशान राहू शकतं याची कल्पना देखील करवत नाही. पण वर्ध्याच्या ग्रामीण भागात कासरखेडा या गावात शेतकऱ्याच्या मुलाने भन्नाट डोकं चालवून उंचावर आलिशान मचाण उभं केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या या मचाणीमध्ये पंखा, मोबाईल, रेडिओ यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या मचाणीची (Machan) चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
शेतात पिकांच वन्यप्राण्यापासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करतात. पण ही मचाण पाहिजे तितकी सुरक्षित नसते.
शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी लक्षात घेत शेतकऱ्यांना शेतात थांबण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केले आहे.
ही मचाण वन्य प्राण्यांना शेतात शिरकाव करण्यापासून रोखते. योगेशने केलेल्या या जुगाडची चर्चा सध्या सगळीकडे आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे... घरी शेती असल्यानं त्यातील अडचणी योगेशच्या परिचयाच्या होत्या.
काही दिवसांपूर्वी रात्री शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला बिबट्यानं फरफटत नेल्याची बातमी योगेशन ऐकली. बातमीनंतर योगेशची तगमग सुरू झाली
शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यजीव आणि पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा, यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले.
कदाचित राज्यात हायटेक मचाण तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी मचाणीवर कोणी असे प्रयोग केले नव्हते.
मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक (Current Proof) लावण्यात आले.
तसेच वरील भागावर सोलर पॅनल लावला आहे. सोलरवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.