PHOTO: इंस्टाग्रामवरून फोटो डाऊनलोड करायचेत? जाणून घ्या सोपी पद्धत!
https://en.savefrom.net/ या वेबसाईट वरून तुम्ही अगदी सहज फोटो तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटर मध्ये सेव्ह करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वप्रथम गूगल वर सेव्ह फ्रॉम नेट सर्च करा.. त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
या साईटवरून तुम्ही फोटो तसेच रिल्स आणि व्हिडियोसुद्धा डाऊनलोड करू शकता.
तुम्ही वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला फोटोत दाखविल्याप्रमाणे विंडो दिसेल.
त्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करायच्या असलेल्या फोटोची लिंक कॉपी करायची आहे.
त्यासाठी फोटो असलेल्या प्रोफाईलवर क्लिक करून डाऊनलोड करायच्या असलेल्या फोटोवर जा.. फोटो उघडा.
त्या फोटोची लिंक तुम्हाला वर दिसेल, ती कॉपी करून घ्या.
सेव्ह फ्रॉम नेट च्या विंडोवर पुन्हा जाऊन हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये ती लिंक पेस्ट करा. लिंक फेच झाल्यावर खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा.
तुम्ही हा डाऊनलोड केलेला फोटो तुमच्या कॉम्प्युटरच्या डाऊनलोड लिस्टमध्ये पाहू शकता.