Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणी सुनावणी; आरोपी व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित, वाल्मिक कराड हात जोडून...
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणी 12 मार्च रोजी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदर सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते.
सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते.
सुनावणी सुरु झाल्यानंतर वाल्मिक कराड हात जोडून उभा होता.
आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्रात पूर्ण कागदपत्रे नसल्याचा मुद्दा मांडला आणि आरोपींचे जबाब बंद लिफाफ्यातून उघडून देण्याची मागणी केली.
बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली.
तसेच आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडेंनी केला. यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली.
सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील युक्तिवाद केला. 26 मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल, असं सांगण्यात आले.
यानंतर न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार असल्याचे सांगितले.
सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?- न्यायालयात या कामाचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्रे आहे, ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे, त्यायबत आज आम्ही मागणी केली आहे, ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळतील, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले.