स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळेकडून बसची व्यवस्था पुरविण्यात येते. अर्थात या बसचा खर्च पालकांकडून घेतला जातो. मात्र, बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण करत जबाबदारी स्वीकारली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शाळेत विद्यार्थ्यांना नेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी आलेल्या या बसचा रंग पिवळाच असतो, हे तुम्ही पाहिलं असेलच. मात्र, शाळेची बस पिवळीच का असते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? आज ते जाणून घेऊ.

आरटीओ कार्यालयाकडून घालून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार शाळांच्या वाहतूक बसचा रंग पिवळा असतो. मात्र, पिवळाच का या प्रश्नाचं उत्तर आज पाहूयात.
रस्त्यावरुन पिवळ्या रंगाचे वाहन जात असल्यास ते दुरूनही तुमच्या डोळ्यांना दिसते, कमी सूर्यप्रकाशातही आणि उजेडातही हा रंग लवकर डोळ्यांना दिसतो. त्यातून ही बस स्कूल बस असल्याचे सहजच लक्षात येते.
पिवळा रंग हा एक इशाराही देतो, रस्त्यावरुन धावणाऱ्या इतर वाहनधारकांना हा रंग सावधानतेचा इशारा देतो. एक शाळेची बस समोरुन किंवा पाठिमागून येत आहे, असा संकेत इतर वाहनांना मिळतो. त्यामुळे, काळजी घेतली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येते.
तसेच, पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतिक मानला जातो. लहान शाळकरी मुलांसाठी त्यांची बस ही आनंदाची सफारी असते, त्यांच्या मित्रांसह ही बस त्यांना शाळेत घेऊन जाते. म्हणून हा रंग पिवळा असतो.
मोटार वाहन नियम, 1978 च्या नियम 178 नुसार शैक्षणिक संस्थेच्या नावाने नोंदणी केलेली सर्व वाहने हायवे पिवळ्या रंगात रंगविली जावीत आणि “स्कूल बस” किंवा “कॉलेज बस” हे शब्द गडद रंगात लिहिलेले असावेत.
शाळेच्या बसमधून जाणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी आपली बस खास असते. या बसमधून शाळेची सफर करताना त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद दिसतो.