Radhika Merchant: अंबानींची सुनबाई, हिरोईनपेक्षा कमी नाही! पाहा फोटो
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत (Anant Ambani) याचा आज साखरपुडा झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनंतचा साखरपुडा त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे.
रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेयर्स परिमल नाथवानी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अशातच आता नेटकरी राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही नेमकी आहे तरी कोण? हे गूगलवर सर्च करत आहेत. तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत की, अंबानींची होणारी सुनबाई आहेत तरी कोण...
राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत (Anant Ambani) खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे.
राधिकाने (Radhika Merchant) श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकलं आहे. राधिका (Radhika Merchant) कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिकाच्या (Radhika Merchant) धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून घेतलं आहे. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे.
पदवी प्राप्त केल्यानंतर, 2017 मध्ये राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली. राधिकाला (Radhika Merchant) पुस्तके वाचण्याची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. 2018 मध्ये राधिकाचा (Radhika Merchant) अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे.
राधिका (Radhika Merchant) अनेक वर्षांपासून अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसत आहे. 2018 मध्ये ईशा आणि आकाश अंबानीच्या साखरपुड्यामध्येही राधिका खूप अॅक्टिव्ह दिसली.
नीता अंबानी आणि ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्यासोबतही राधिकाचे अतिशय चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते.
राधिकाच्या (Radhika Merchant) सोशल मीडिया पेजवरही नीता आणि मुकेश अंबानीसोबत Mukesh Ambani) अनेक फोटो आहेत. 2019 मध्ये दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली होती. मात्र नंतर रिलायन्स समूहाने ही अफवा असल्याचे म्हटले होते.