Indian Currency : 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी नेमका किती रुपये खर्च येतो, तुम्हाला माहितीय?
तुमच्या खिशात असणारी नोट (Currency Note) म्हणजे रंगीत कागद आहे. पण कागदावरील रंग आणि अंक यावरुन त्याची किंमत ठरते. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाशिवाय 100 रुपयाच्या हजार नोटा छापण्यासाठी 1770 रुपये खर्च येतो. तसेच 200 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2370 रुपये खर्च आणि 500 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च येतो. (PC:istock)
तुमच्या खिशातील नोट 10 रुपयांची असो 20 रुपयांची असो 100 ची असो किंवा 2000 ची, ही प्रत्येक नोट छापण्यासाठी वेगळा खर्च होतो. (PC:istock)
नोटांच्या छपाईचा खर्च आता वाढला आहे. नोटांची छपाई आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. कागदाचा खर्च, छपाईचा खर्च वाढल्याने नोटांच्या छपाईचा खर्चही वाढला आहे. (PC:istock)
सर्वात जास्त खर्च 200 रुपयांची नोट छापण्याचा आहे. 2020-21 या वर्षात 50 रुपयांच्या हजार नोटांच्या छपाईचा खर्च 920 रुपये होता, जो 2021-22 मध्ये 23 टक्क्यांनी वाढून 1,130 रुपये झाला. (PC:istock)
नोटांच्या छपाईच्या खर्चात आता वाढ झाली आहे. दरम्यान, नाणी बनवण्यासाठी नोटांच्या तुलनेने अधिक खर्च येतो. काही नाणी बनवण्याचा खर्च त्याच्या मूळ किमतीपेक्षाही अधिक आहे. (PC:istock)
नोट छपाईची किंमत नोटेनुसार बदलते. 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 या प्रत्येक नोटा छापण्याचा खर्च वेगवेगळा असतो. (PC:istock)
2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सुमारे 4 रुपये खर्च येतो. 2018 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 4.18 रुपये खर्च यायचा, तर 2019 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 3.53 रुपये खर्च आला होता. (PC:istock)
मात्र, त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेची छपाईची किंमत कमी झाली. सध्या 2000 रुपयांची नोट छापणे बंद आहे, मात्र 2000 ची नोट चलनात आहे. (PC:istock)
ताज्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या हजार नोटांची छपाई करण्यासाठी 960 रुपये खर्च येतो, म्हणजेच प्रत्येकी एक नोट छापण्यासाठी 1 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. (PC:istock)