'या' ठिकाणी किस करणं तुम्हाला पडू शकते महागात; काय सांगतो भारतातील कायदा?
चित्रपटांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री पार्क, मेट्रो किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहित आहे का? भारतासह इतर अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किस करणे गुन्हा आहे. आणि यासाठी शिक्षा पण आहे.
भारताचे अनेक नियम अतिशय कडक आहेत. भारतीय नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कोणीही किस करू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यास कलम 294 अंतर्गत कारवाई होऊ शकते.
दिल्ली उच्च न्यायालयचे वकील नियाज अहमद खान यांच्या मते, आयपीसीच्या कलम 294 म्हणजे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
यामध्ये दोषी सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
इंडोनेशियामध्येही याबाबत कठोर नियम आहेत. येथे सार्वजनिक ठिकाणी किस घेताना आढळल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
जपानमध्येही सार्वजनिक ठिकाणी किस करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.