Diego Tortoise : 800 मुलांचा 'बाप' वय 100 वर्ष, डिएगो कासवाचा विक्रम; प्रजाती वाचवण्यात मोठं योगदान
इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. गलापागोस ही कासवांची प्रजाती वाचवण्यामध्ये या कासवाचं मोठं योगदान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिएगो कासव 100 व्या वर्षी 800 मुलांचा 'बाप' आहे.
चेलोनोइडिस हडेन्सिसची ही कासवांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती.
यामुळे कासवांची ही प्रजाती वाचवण्यासाठी एक विशेष मोहिम राबविण्यात आली.
ज्यामध्ये गालापागोस बेटावरील चेलोनोइडिस हडेन्सिस कासवांची आवश्यकता होती.
गलापागोस ही कासवांची प्रजाती वाचवण्याच्या मोहिमेत डिएगो कासवाचा मोठा वाटा आहे.
या मोहिमेत डिएगो कासवाने या प्रजातीच्या 800 मुलांचा बाप बनला आहे. आता या कासवाचे वय 100 वर्षे आहे
1960 मध्ये, संपूर्ण पृथ्वीवर चेलोनोइडिस हुडेन्सिस प्रजातीची केवळ 15 कासवं शिल्लक होती. यामुळे ही प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.
चेलोनोइडिस हडेन्सिस या कासवाच्या प्रजातीला वाचवण्याच्या मोहिमेत डिएगोचा समावेश करण्यात आला होता.
या संपूर्ण मोहिमेअंतर्गत एकूण 2000 कासवे जन्माला घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जन्मलेल्या एकूण कासवांच्या संख्येपैकी 40 टक्के कासवांना जन्म देण्यामध्ये डिएगो कासवाचा वाटा आहे.
सुमारे 50 वर्षांपूर्वी या मोहिमेमध्ये डिएगो कासवासोबत आणखी 15 कासवांचा समावेश करण्यात आला होता.