4500 वर्ष जुन्या गिझा पिरॅमिडमध्ये सापडला कॉरिडॉर, नऊ मीटर लांबीच्या कॉरिडॉरचे फोटो व्हायरल
जगातील प्राचीन सात आश्चर्यांपैकी एक इजिप्तमधील (Egypt) गिझा पिरॅमिडबाबत (Giza Pyramid) अद्यापही अनेक रहस्य लपलेली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता शास्त्रज्ञांच्या संशोधनात मोठं नवं रहस्य समोर आलं आहे. यामुळे गिझा पिरॅमिड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये छुपा कॉरिडॉर (Corridor) सापडला आहे. यामुळे शास्त्रज्ञ चकित झाले आहेत. नऊ मीटर लांबीचा कॉरिडॉर सापडला आहे.
4500 वर्षे जुन्या गिझाच्या भव्य पिरॅमिड (The Great Pyramid of Giza) डीप स्कॅनिंग (Deep Scanning) सुरु आहे.
गिझाचं भव्य पिरॅमिड (The Great Pyramid of Giza) जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. हे पिरॅमिड 4500 वर्षांपूर्वी इजिप्तच्या राजाने तयार केलं होतं. हे पिरॅमिड मुळात एक कबर आहे. इजिप्तच्या चौथ्या घराण्याची ही कबर आहे.
या पिरॅमिडबाबत अद्याप अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. शास्त्रज्ञांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. आता पुरातत्व शास्त्रज्ञांना छुपा कॉरिडॉर सापडला आहे.
इजिप्तमधील गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये लांब कॉरिडॉर सापडला आहे. पिरॅमिडच्या उत्तरेकडील बाजूच्या संशोधनात हा कॉरिडॉर सापडला आहे.
हा कॉरिडॉर नऊ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आहे. हा कॉरिडॉर पिरॅमिडच्या मुख्य गेटच्या वरच्या भागात सापडला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जाही हवास आणि पर्यटन मंत्री अहमद इसा यांनी या कॉरिडॉरबाबत माहिती दिली आहे.
इजिप्तमधील पुरातत्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पिरॅमिडमध्ये अनेक रहस्यं येत्या काळात उलगडतील. प्राचीन जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या या गीझाच्या भव्य पिरॅमिडचं रहस्य उलगडण्यासाठी पिरॅमिड स्कॅनिंग प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता.
या पिरॅमिडमधील रहस्य जाणून घेण्यासाठी इन्फ्रारेड थर्मोग्राफी, 3D सिम्युलेशन आणि कॉस्मिक-रे इमेजिंग यांसारख्या नॉन-इनवेसिव्ह तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.