खरेदीपेक्षा चोरी जास्त! कोणत्या वस्तूंच्या चोरीमुळे डीमार्टला सगळ्यात जास्त फटका बसतो?
डीमार्टमध्ये काही ग्राहक खरेदीच्या नावावर चॉकलेट्स, स्नॅक्स, परफ्यूम्स आणि छोटे इलेक्ट्रॉनिक आयटम्स यांसारख्या वस्तूंची चोरी करून जातात.
Dmart thefts
1/8
खरेदीसाठी ओळखला जाणारा डीमार्ट आता नव्या पद्धतीच्या चोरीमुळे चर्चेत आला आहे.ग्राहक असल्याचं भासवून काही लोक चोरी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
2/8
ट्रायल रूममध्ये चॉकलेट खाणं आणि महागड्या वस्तू लपवण्याच्या घटना आता वाढताना दिसतायत.
3/8
ट्रायल रूममध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे काही ग्राहक कपडे ट्राय करण्याच्या बहाण्याने ट्रायल रूममध्ये जाऊन महागडे चॉकलेट्स खातात तर काहीजण लहान वस्तू अंडरगारमेंट्समध्ये लपवून स्टोअरबाहेर जातात.
4/8
लहान मुलांनी स्टोअरमधील चॉकलेट खाल्लं तरी त्यांचे पालक काही बोलत नाहीत आणि त्याचे पैसेही देत नाहीत.
5/8
रिटेल तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, छोट्या चोरींमुळे प्रत्येक डीमार्ट स्टोअरला रोज जवळपास 5 ते 10 हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
6/8
स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असले तरी गर्दीच्या वेळी सर्वांवर नजर ठेवणं कठीण जातंय.
7/8
डीमार्ट व्यवस्थापनाने या समस्येवर उपाय म्हणून महागड्या वस्तू लॉक असलेल्या शेल्फमध्ये ठेवणे, अधिक सीसीटीव्ही लावणे, स्टाफ वाढवणे आणि बॅग टॅग सिस्टीम सुरू करणे अशा उपाययोजना केल्या आहेत.
8/8
बिलिंग काउंटरवरच बॅगा उघडता येतात त्यामुळे चोरी काही प्रमाणात कमी झाली आहे.पण अंडरगारमेंट्समध्ये वस्तू लपवणे किंवा स्टोअरमध्येच खाऊन टाकणे या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे अजूनही कठीण आहे.
Published at : 21 Aug 2025 01:38 PM (IST)