बीडकरांची स्वप्नपूर्ती; उद्या पहिली रेल्वे धावणार, जाणून घ्या इतिहास?

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत उद्या अहिल्यानगर ते बीड रेल्वे लोहमार्गावर पहिली रेल्वे धावणार आहे.

Beed Railway News

1/6
बीडकरांची या विशेष प्रसंगामुळे दीर्घकाळापासूनची स्वप्नपूर्ती अखेर साकार झाली. येथे अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती, अखेर स्वप्नपूर्ती झाल्याने बीडकरांमध्ये याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
2/6
बीडमधील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना पहिल्या रेल्वेची सफर घडवली जाणार आहे.
3/6
अहिल्यानगर ते बीड हा रेल्वे लोहमार्ग तब्बल 261 किलोमीटर लांब असून, या दरम्यान 16 स्थानके आहेत.
4/6
केंद्र आणि राज्य सरकारचा निधी या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मिळाला आहे.
5/6
बीडच्या पालवण भागात आधुनिक सुविधांसह रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे.
6/6
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला. तर आता विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या काळात ही रेल्वे आली आहे.
Sponsored Links by Taboola