Travelling Tips : फिरायला गेलात की खिसा रिकामा होतोयत का? ‘या’ 5 स्मार्ट टिप्स तुम्हाला बचत करण्यास मदत करतील...

Travelling Tips : फिरायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण कुठे जायचं म्हटलं की बजेट बिघडण्याची भीती प्रत्येकाला असते.

Continues below advertisement

फिरायला गेलात की खिसा रिकामा होतोय? मग या 5 टिप्सने प्रवासात बचत करा!

Continues below advertisement
1/7
फिरायला जायचं नाव काढलं की सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मनात येते ती म्हणजे खर्च. अनेकदा लोक तक्रार करतात की प्रवासादरम्यान त्यांचे बजेट बिघडते आणि त्यांचे खिसे लवकर रिकामे होतात.
2/7
तुम्ही जर फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल तर ऑफ-सीझन बुकिंग करा, कारण सुट्टीच्या काळात हॉटेल आणि विमानांच्या किमती गगनाला भिडतात.
3/7
नवीन ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानिक बस किंवा मेट्रो वापरा. हे केवळ स्वस्त नसतात, तर त्या ठिकाणाची संस्कृती आणि लोक यांना जवळून पाहण्याची संधीही देतात.
4/7
महागड्या रेस्टॉरंट्सऐवजी स्ट्रीट फूडचा आनंद घ्या, कारण ते स्वस्त असतं आणि त्या ठिकाणाची अस्सल व पारंपारिक चव चाखायला मिळते.
5/7
तुम्ही वारंवार विमान प्रवास करत असाल किंवा हॉटेलमध्ये राहत असाल तर क्रेडिट कार्ड किंवा एअरलाइन/हॉटेल लॉयल्टी प्रोग्राम वापरा. ट्रॅव्हल पॉइंट्स जमा करून तुम्हाला पुढच्या ट्रिपमध्ये मोफत फ्लाइट तिकीट किंवा हॉटेल स्टे मिळू शकतो.
Continues below advertisement
6/7
प्रवासादरम्यान अनेकदा नवीन गोष्टींचा मोह होतो आणि अनावश्यक खरेदी केली जाते. प्रत्येक दुकानातून खरेदी केल्याने पाकीट लवकर रिकामे होऊ शकते. त्यामुळे खरेदीसाठी नियत बजेट ठेवा आणि फक्त आवश्यक किंवा त्या ठिकाणासाठी खरोखर खास असलेल्या वस्तूच खरेदी करा.
7/7
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola