International Yoga Day 2022 : नागपुरात 'योगा फार ह्युमॅनिटी'मध्ये हजारो साधकांनी केले योग प्रात्यक्षिक

Nagpur : कस्तुरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

1/10
कस्तुरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्था, योगा मंडळे आणि विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. हजारोंच्या संख्येत नागरिक यात सहभागी झाले होते.
2/10
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कस्तुरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीसह शहरातील विविध संस्था प्रतिनिधींची मंचावर उपस्थिती होती. सर्वांनी योग प्रात्यक्षिक आणि प्राणायम केले.
3/10
'योगा फार ह्युमॅनिटी'या थीमवर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि योग हा एका दिवसापुरताच मर्यादित नसावा तर याचा समावेश जीवनशैलीचा एक भाग करावा असे आवाहनही त्यांनी केले.
4/10
शहरातील प्रमुख योगा मंडळांच्या प्रतिनिधींचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
5/10
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमातअबाल-वृद्धांनी उत्साहाने सहभाग नोंदविल्याने वातावरणात उर्जा संचारली होती. तसेच जागतिक योग दिनानिमित्त हजारो योग साधक एकत्र येत असल्याने एक वेगळेच सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना सहभागींनी बोलून दाखविली.
6/10
देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या 'झिरो माईल्स'च्या नागपूरचीही निवड झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैसूर कर्नाटक येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
7/10
कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी मेट्रोतर्फे निःशुल्क सेवा देण्यात आली असल्याने शेकडो नागरिकांनी या मेट्रोसेवेचाही लाभ घेतला.
8/10
हिंगणा पोलिस स्टेशनमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
9/10
नारीशक्ती योगा मंडळातर्फे हनुमान मंदिर, जानकीनगर येथे योगशिक्षिका विद्या कपूर यांच्या मार्गदर्शनात प्रिती चोपडा, मिनाक्षी लीखार यांच्यासह महिलांनी योगा आणि प्राणायम करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
10/10
शिवशक्ती हनुमान मंदिर, खरबी रोड येथे नागरिकांच्यावतीने योगा दिवस साजरा करण्यात आला.
Sponsored Links by Taboola