JCB चालकासह कंटेनर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला; NDRF पथक घटनास्थळी
वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाइनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचून जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वसईतील वर्सोवा ब्रीजजवळ ही घटना घडली आहे. कंटेनरसह काहीजण या मलब्याखाली अडल्याची माहिती होती.
कंटेनरखाली अडकलेल्या पाच ते सात व्यक्तींना मलब्याखालून काल रात्रीच बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, जेसीबीचा चालक जेसीबीसह मल्यब्याखाली अडकला आहे.
नायगाव पोलीस आणि वसई विरार पालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून जेसीबीसह चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बुधवारी 0रात्री 9:30 वाजताच्या सुमास ही दुर्घटना घडली आहे. सध्या जेसीबीचा चालकाला रेस्क्यू करण्याचं काम सुरु आहे.
अपघातस्थळी मदत व बचावकार्यासाठी एन.डी.आर.एफ.चे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत आहेत.
दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मलबा हटवण्यात येत असून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जेसीबी चालकाचा शोध घेण्यात येत आहे