ठाण्यातील कशेळी खाडीत 53 वर्षीय व्यक्तीने घेतली उडी; पाण्यात उतरून शोधमोहिम सुरू

मुंबईतील अटल सेतूवरुन उडी घेत एका युवकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तर, कोकणातील विशिष्ठा नदीत उडी घेऊन दामप्त्याने जीव दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.

Thane man jumped in kasheli krik TDRF

1/7
मुंबईतील अटल सेतूवरुन उडी घेत एका युवकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तर, कोकणातील विशिष्ठा नदीत उडी घेऊन दामप्त्याने जीव दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.
2/7
मुंबई, कोकण येथील घटना ताजी असतानाच आता ठाणे येथील लोहमार्गाजवळ असेलल्या खाडीत 53 वर्षे वयाच्या इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
3/7
ठाण्यातील कशेळी ब्रिज येथील कशेळी खाडीमध्ये एका व्यक्तीने उडी मारुन आपली जीवन संपवले.
4/7
रविवारी मैत्री दिनाच्या सकाळीच साधारण साडेआठ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व टीडीआरएफच्या जवांनांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
5/7
खाडीतील पाण्यात उडी घेणारा व्यक्ती बुडाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप संबंधित व्यक्तीचा कुठलाही शोध मिळालेला नाही.
6/7
ठाणे महापालिकेच्या टी.डी.आर.एफच्या जवानांकडून मागील सात तासापासून शोध कार्य सुरू आहे. दरम्यान, उडी घेणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळाली नसून घटनेचं कारणही माहिती नाही
7/7
टीडीआरएफचे जवान कशेळी खाडीत उतरले असून बोटीतून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी नातेवाईक व स्थानिकांनीही गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
Sponsored Links by Taboola