ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते- रिझर्व्ह बँक संचालक सतीश मराठे
कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते... रिझर्व्ह बँक संचालक सतीश मराठे
Continues below advertisement
bhiwandi
Continues below advertisement
1/7
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील गिरीराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव भारतीय रिझर्व्ह बँक संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.
2/7
या प्रसंगी भागधारक ,खातेदार मोठ्या संख्येने हजर होते.
3/7
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते पतसंस्थेचे संस्थापक कै बीपीनचंद्र ठक्कर यांच्या कुटुंबियांसह ,संस्थेचे आजीमाजी संचालक , कर्मचारी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला
4/7
भारत कृषीप्रधान देश असून या देशात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.या उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतला तर ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे अर्थकारण बदलू शकते, तेथील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले आहे.
5/7
भारतात कृषी उद्योगाला आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध होत असल्याने पतसंस्थांनी पुढाकार घेऊन जर कृषी प्रक्रिया उद्योग,त्या सोबतच कृषी मालाची साठवणूक करणारे शितगृह उभारले तर शेतकरी आपला शेतीमाल त्या ठिकाणी साठवणूक करून बाजारात चांगला भाव मिळेल त्या वेळेस ते उत्पन्न विकून चांगला नफा शेतकरी मिळवू शकतो व त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थानिक पतसंस्था मदत करणाऱ्या झाल्या तर या भारताचे चित्र बदलू शकते असे सांगत समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पतसंस्था, विविध विकास सोसायटी पोहचत असल्याने केंद्र व राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन सतीश मराठे यांनी केले .
Continues below advertisement
6/7
परप्रांतातील सोने तारण कर्ज देणाऱ्या खाजगी कंपन्या या पतसंस्थां वर अतिक्रमण करीत आहेत.फसव्या व्याजदरात अनेकांना भरडत असताना महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आत्मपरीक्षण करून पतसंस्थांनी लॉकर सुविधा सुरू करण्यापेक्षा सुरक्षित सोने तारण कर्ज देण्याकडे आपला कल वाढवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले.
7/7
कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते... रिझर्व्ह बँक संचालक सतीश मराठे
Published at : 10 Jan 2023 10:14 PM (IST)
Tags :
Bhiwandi