एकीकडे शक्तिपीठला मंजुरी, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर जीवघेणे खड्डे; मनसेचा संताप
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने या दरम्यानचा मार्ग नुकताच 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला.
Continues below advertisement
Samruddhi highway pathole mumbai
Continues below advertisement
1/8
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने या दरम्यानचा मार्ग नुकताच 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला.
2/8
उद्घाटनानंतर काहीच दिवसांत या महामार्गावर गंभीर त्रुटी उघड होत असून शहापूर भागात महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याचे समोर आले आहे.
3/8
या खड्ड्यांमुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात आले असून, वाहन चालवताना नियंत्रण बिघडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4/8
विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची अशी अवस्था दिसून येत असल्याने महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
5/8
प्रवाशांनी महामार्ग प्रशासनाकडे लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी उर्वरित ठिकाणी तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
Continues below advertisement
6/8
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गावर अशा त्रुटी निर्माण होणे, याकडे यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत असून मनसेचे नेते राजू पाटील यांनीही ट्विट करुन महामार्गावरील खड्ड्यात भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं आहे.
7/8
समृद्धी महामार्गाला पडलेले हे खड्डे टक्केवारी लाटून केलेल्या भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे आहेत. 70 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे, अशी टीका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
8/8
एकीकडे राज्य सरकार गोवा-मुंबई, शक्तिपीठ महामार्ग (जनतेचा विरोध डावलून ) असे अनेक मोठे प्रकल्प सुरू करायचा विचार करत आहे किंबहुना काही कामांचे आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, राज्यातील रस्ते बघता आपल्या राज्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेस रस्ता वगळता इतर रस्त्यांची गुणवत्ता एकंदरीतच निकृष्ट दिसते, असेही पाटील यांनी म्हटले.
Published at : 25 Jun 2025 04:43 PM (IST)