Bhiwandi Potholes: भिवंडीत मनसेचं खड्ड्यांविरोधात आंदोलन; खड्ड्यात रांगोळी काढून पूजन
महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांमध्ये खड्ड्यांची समस्या उद्भवते, यामुळे बऱ्याच अपघातांच्या घटना घडतात आणि नागरिकांनी अनेक त्रासांनाही सामोरं जावं लागतं. भिवंडीतील खड्ड्यांमुळेही नागरिक हैराण झाले आहेत.
Continues below advertisement
MNS protest against potholes in Bhiwandi
Continues below advertisement
1/9
सध्या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सर्वत्रच जाणवत आहे, वाहनधारक आणि नागरिकांना खड्ड्याच्या समस्येमुळे त्रास होत आहे आणि याविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली आहे.
2/9
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना खड्ड्यांविरोधात उग्र आंदोलन करण्याचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मनसे कार्यकर्ते खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
3/9
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात तीन ठिकाणी खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं.
4/9
भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष मनोज गुळवी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालयासमोर झालेल्या आंदोलनात पालिका प्रशासनाचा धिक्कार करत स्वर्गीय आनंद दिघे चौक या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचं पूजन केलं आहे.
5/9
या आंदोलनात मनसे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे आणि मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते.
Continues below advertisement
6/9
मनसेने खड्ड्यांबद्दल आपलं निवेदन पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केलं आहे
7/9
भिवंडी ग्रामीण वतीने अंजूर फाटा येथील कामण वसई रस्त्यावर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, जिल्हा समन्वयक मदन अण्णा पाटील, जिल्हा पदाधिकारी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
8/9
तालुकाध्यक्ष विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबाडी नाका येथे आंदोलन करत रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.
9/9
मनसेने खड्ड्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून सर्वत्र आंदोलनाचा धडाकाच लावला आहे.
Published at : 21 Aug 2023 08:36 PM (IST)