माथेरानच्या धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, सगळे कसं एकदम झक्कास
matheran waterfall
1/9
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून तयार होणारे फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालत असतात.
2/9
गेल्या एक आठवड्यापासून माथेरान परिसरात पावसानं जोर धरल्याने आता येथील धबधब्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
3/9
त्यामुळे पावसाळ्यात माथेरानला येणारे पर्यटकांची पावलं या फेसाळणाऱ्या धबधबाकडे वळत आहेत. विशेषतः वीकेंडच्या दिवशी या धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
4/9
सध्या पाऊसाने चांगलाच जोर धरला असून माथेरान मध्ये आता पावसाळी पर्यटन हंगाम सुरू झालाय, येथे डोंगरदार्यांमध्ये ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे इथला हिरवा गार निसर्ग आणि पावसाळी धुक्यातून रस्त्याने वाट शोधत जाताना पर्यटकांच्या होणार्या मज्जा मस्तीची वेगळाच आनंद असतो.
5/9
तर कधी कधी कोसळणार्या जोरदार पावसाने येणार्या पर्यटकांची उडणारी त्रेधातिरपीट अश्या अनेक गोष्टींनमुळे माथेरानचे पावसाळी पर्यटन खुलून गेलंय.
6/9
माथेरानमधील पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील नेरळ ते माथेरान या रस्त्यावर लागणारा मोठा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असतो.
7/9
या धबधब्यावर शेकडोच्या संख्येने पर्यटक इथं मनसोक्त आनंद लुटतात, यामध्ये महिला, पुरुष , लहान मुलांसह सगळेच येथे या वॉटरफॉलची मजा घेताना दिसतात.
8/9
माथेरान मध्ये पावसाळ्यात निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहण्यास पर्यटक आवर्जून या पर्यटन स्थळाला भेट देतात.
9/9
माथेरानच्या धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, रविवारी धबधबे झाले फुल्ल
Published at : 10 Jul 2022 05:36 PM (IST)