Building collapses : भिवंडीत दुमजली इमारत कोसळली
भिवंडी (Bhiwandi) शहरातील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
Bhiwandi building collapses
Continues below advertisement
1/9
भिवंडी (Bhiwandi) शहरातील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली.
2/9
भिवंडी इमारत कोसळल्यामुळं दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
3/9
परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना माहिती घडताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
4/9
दोन मजली इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिकार्याखाली दाबले गेले आहेत.
5/9
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Continues below advertisement
6/9
भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं.
7/9
इमारतीच्या ढिगार्याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सहाही जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्याची मोहीम अग्निशमाक दलाच्या जवानांनी हाती घेतली. यामध्ये चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला आहे.
8/9
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
9/9
भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला 40 ते 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीसा देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्याने दिली आहे.
Published at : 03 Sep 2023 06:40 AM (IST)