Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmi Thackeray : फू बाई फू... ठाण्यात मंगळागौरच्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची हजेरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी काल (मंगळवारी) ठाण्यातील कापूरबावडी परिसरात आयोजित मंगळागौरीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे (Thane) लोकसभेचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत केलेल्या ऐतिहासिक बंडानंतरही ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही.
त्यामुळं साहजिकच राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी मंगळागौरीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
ठाणे शहर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळं शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातल्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी लक्षणीय मानली जात आहे.
काल रश्मी ठाकरे मंगळागौरीसाठी उपस्थित राहिल्या खऱ्या, पण या ठाणेभेटीत त्यांनी राजकीय संवाद आवर्जून टाळला.
सध्या ठाण्यात शिवसेनेची परिस्थिती बघता रश्मी ठाकरे कार्यक्रमात सहभागी होऊन महिला आणि सेना कार्यकर्त्यांबरोबर हितगुज करतील किंवा त्यांना भेटून त्याचा बरोबर गप्पा मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र रश्मी ठाकरे यांनी या कार्यक्रमाला केवळ सहभाग नोंदवून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
मंगळागौरीच्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावल्यामुळे महिलांचा उत्साह आणखी द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं.