Konkan Railway Ganpati: कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, 24 तास आधीपासून रांगा

Ganesh utsav 2025 Konkan Railway: गणपतीसाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्याप्रमाणावर कोकणात जातात. ठाणे रेल्वे स्थानकांत कोकणवासियांनी 24 तास आधीपासून रांगा लावल्या आहेत.

Konkan Railway Ganpati

1/11
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्याप्रमाणावर हाल झाले.
2/11
काल रात्री मांडवी एक्स्प्रेस पकडण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात जनरल डब्यात चढण्यासाठी भलीमोठी रांग लागली होती.
3/11
ठाणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक सातवर मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी रांग लागली होती. काही प्रवाशांनी 24 तास आधी येऊनच रांग लावली होती.
4/11
ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र, त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.
5/11
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.
6/11
कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल २५ तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली. पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे. रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
7/11
तब्बल एक तासाच्या नंतर मडगाव मांडवी एक्सप्रेस ठाणे स्थानकात आली. 24 तास अगोदरच गणेशोत्सव निमित्त कोकणवासी रांगेत उभे होते. 7 वाजून 55 मिनिटांची गाडी 9 नंतर ठाणे स्थानकात आली.
8/11
ठाणे स्थानकात लागलेली प्रवाशांची रांग
9/11
गणपतीच्या काळात कोकणासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात.
10/11
कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी
11/11
गणपतीचे आगमन 27 ऑगस्टला होणार आहे. त्यापूर्वी आपापल्या गावी जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग सुरु आहे.
Sponsored Links by Taboola