Tansa Sanctuary : तानसा अभयारण्यात वणवा, औषधी वनस्पती जळून खाक
ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा (Tansa Sanctuary Fire) लागल्याची घटना घडली.
Tansa sanctuary Fire
1/10
ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा (Tansa Sanctuary Fire) लागल्याची घटना घडली आहे.
2/10
अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे.
3/10
सायंकाळच्या सुमारास हा वणवा लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवता आले नाही.
4/10
वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळं वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची दाट शक्यता आहे
5/10
ही आग रात्री उशिरापर्यंत सुरु असल्यानं जंगलातील अनेक झाडांचे नुकसान झालं आहे. तसेच अनेक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
6/10
शहापूर तालुक्यातील नांदगाव जवळील तानसा अभय अरण्यात अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्य जीवांचे जीव धोक्यात आले आहे
7/10
जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. दरवर्षी आग लागून हजारो झाडांचे नुकसान होण्याचा प्रकार घडत आहेत
8/10
आग लागल्यानंतर ग्रामस्थ कोणत्याही अग्निशमन साधनशिवाय आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी वनविभागाशी तात्काळ संपंर्क न झाल्याने आगीचे रूपांतर वणव्यात होते
9/10
मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
10/10
वनक्षेत्रांमधील वणवा लागण्याचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये मोठी वृक्षसंपदा नष्ट झाली आहे.
Published at : 16 Mar 2023 07:08 AM (IST)