Ram Mandir : डोंबिवलीत अयोध्येच्या श्रीराम मंदिराप्रमाणे मंदिर, एक महिनाभर चालणार वेगवेगळे कार्यक्रम
Dombivli Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत महिनाभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Dombivli Ram Mandir
1/8
समस्त देशवासिय ज्या अयोध्येतील राम मंदिराची आतुरतेने वाट पाहत आहेत त्या राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी होत आहे. त्या निमित्ताने डोंबिवलीत महिनाभर उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
2/8
डोंबिवली जिमखान्याच्या मैदानात 25 बाय 50 चे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरात शनिवारी श्रीरामाच्या प्रतिमा पूजन करण्यात आलं.
3/8
हा उत्सव महिनाभर चालणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वाजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
4/8
या निमित्ताने डोंबिवलीतील सर्व सांस्कृतिक संस्थानी एकत्र येत श्रीरामावर आधारित गीत तयार केले असून हे गीत या कार्यक्रमाच्या प्रसंगी लॉन्च करण्यात आले.
5/8
राम मंदिराच्या प्रतिकृतीची डोंबिवलीतील कलाकारांनी महिनाभर झटून उभी केली आहे. 28 जानेवारीपर्यंत हे मंदिर डोंबिवलीकर नागरिकांना पाहता येणार आहे.
6/8
धनजय भोसेकर हे 18 ते 21 जानेवारी दरम्यान 'गीत रामायण' सादर करणार असून हा कार्यक्रम जिमखान्याच्या मैदानावर होणार आहे.
7/8
स्वामी नारायण ट्रस्टतर्फे श्री रामचरीत मानस सादर केले जाणार आहे. रामाची यशोगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
8/8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 वर्षात जे घडले नाही ते शक्य केले असून त्यामुळे जनमानसातून त्यांचे कौतुक होत असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
Published at : 24 Dec 2023 04:41 PM (IST)