देवेंद्र फडणवीसांची आवडती गायिका कोण? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं... 15 मिनिटांसाठी आले अन् पूर्ण कार्यक्रम ऐकूनच गेले...

पंधरा मिनिटांसाठी ठाण्यातील कार्यक्रमाला आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण कार्यक्रम बघून घरी गेले.

Devendra Fadnavis

1/10
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आवडत्या गायिकेविषयी आज ठाण्यात सांगितलं आहे.
2/10
मैथिली ठाकूर त्यांची सर्वात आवडती गायिका असल्याचा भाषणात त्यांनी उल्लेख केलाय.
3/10
पंधरा मिनिटांसाठी या कार्यक्रमाला आलेले उपमुख्यमंत्री पूर्ण कार्यक्रम बघून घरी गेले.
4/10
संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलसाठी ते ठाण्यात आले होते.
5/10
यावेळी गायिका मैथिली ठाकूरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
6/10
यावेळी फडणवीस म्हणाले की, मैथिली तुम्हाला सरस्वतीचा आशीर्वाद आहे.
7/10
मी नेहमी युट्यूब वर तुम्हाला ऐकतो, आज प्रत्यक्षात बघायला मिळालं, असं ते म्हणाले.
8/10
फडणवीस म्हणाले, त्या मूळच्या बिहारी आहेत पण आज तुकडोजी महाराज यांचे भजन यांनी गायले. त्यात वाटले नाही, त्या मराठी नाहीत.
9/10
नेहमी ऑनलाईन बघायचे आज प्रत्यक्षात बघत असल्याने थांबणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी मैथिली गात असलेला श्लोक उपमुख्यमंत्री फडणवीस देखील गात होते.
10/10
ते प्रेक्षकांमध्ये बसून मैथिली ठाकूर सोबत गात असल्याचं दिसून आलं.
Sponsored Links by Taboola