PHOTO : अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद', अंबरनाथमध्ये बोकडाची किंमत लावली तब्बल सव्वा कोटी!
अंबरनाथमध्ये एका बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बोकडाचं नाव शेरु आहे.
त्याच्या अंगावर अल्लाह तसंच मोहम्मद लिहिलेलं असल्याने शेरुला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे.
या बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असं लिहिण्यात आल्याचा दावा त्याच्या मालकाने केला.
त्यामुळेच मालकाने या बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी ठेवली आहे.
या पैशांतून गावी मदरसा बांधण्याचं बोकड मालकाचं स्वप्न आहे.
अंबरनाथच्या तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो.
त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं, त्याचं नाव शेरु असं ठेवलं.
या शेरुला लहानपणापासून अतिशय या प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केलं.
शेरुला फक्त दोन दात असून त्याचं वजन 100 किलो इतकं आहे.