Fire : भिवंडीत तीन मजली इमारतीला आग

भिवंडीतील पिराणी पाडा परिसरात तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली.

Bhiwandi Fire

1/9
भिवंडीतील पिराणी पाडा परिसरात तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली.
2/9
इमारतीमधील रहिवाशांना सुखरुप काढलं बाहेर काढण्यात आले आहे.
3/9
सुरुवातील भिवंडी शहरातील पिराणी पाडा परिसरात फळांच्या कॅरेटला अचानक भीषण आग लागली होती. त्यानंतर इमारतीला आग लागली.
4/9
आगीची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
5/9
बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले आणि शेजारच्या तीन मजली इमारतीला देखील आग लागली.
6/9
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
7/9
यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं या इमारतीमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे.
8/9
एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
9/9
दरम्यान, या आगीच्या घटनेदरम्यान, एक पोलीस कर्मचारी खड्ड्यात पडल्याने जखमी झाला आहे.
Sponsored Links by Taboola