Xiaomi चा नवीन फिटनेस बँड लॉन्च; काय आहेत फीचर्स आणि किंमत?
चीनची कंपनी Xiaomi ने आज आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Mi 6 Band लाँच केले आहे. यापूर्वी ते या वर्षी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने त्याची किंमत 3,499 रुपये ठेवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMi 6 Band हे Mi 5 Band सारखेच आहे. त्यात Mi Band 5 पेक्षा मोठी OLED स्क्रीन आहे. हे आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेईल. यात काही खास फीचरही देण्यात आले आहेत.
Mi 6 Band वॉटर-रेझिस्टंट बिल्ड आणि नवीन टच सपोर्टेड डिस्प्लेने सुसज्ज आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी यात SPO2 सेन्सर आहे. त्याची खासियत म्हणजे हा बँड तुम्हाला स्ट्रेस दूर करण्यासाठी टिप्स देखील सांगेल. यासह यात 24X7 हार्ट रेड मॉनिटरिंग सिस्टम आहे.
Mi 6 Band मध्ये 30 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. असा दावा करण्यात आला आहे की त्याची बॅटरी एकाच चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅकअप देईल. यात 125mAh ची बॅटरी आहे. हा बँड चालणे, धावणे, सायकलिंग सारख्या 6 अॅक्टिव्हिटीजला देखील सपोर्ट करतो. यात स्लीप ट्रॅकिंग फीचर देखील आहे.
Mi चा हा विशेष बँड 50 मीटर पर्यंत पाण्यातही खराब होणार नाही. यामध्ये ब्लूटूथ 5.0 देण्यात आला आहे. यात 1.56 इंचाचा टच डिस्प्ले आहे. चार रंग पर्यायांमध्ये हा बँड उपलब्ध आहे.
Mi 6 Band भारतात सॅमसंग, रियलमी आणि ओप्पो सारख्या ब्रँड सोबत स्पर्धा करेल. या ब्रँडच्या बँडना भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व कंपन्या लेटेस्ट फीचर्ससह बँड लाँच करतात. Mi बँड या ब्रँड्सच्या फिटनेस बँडशी कशी स्पर्धा करते हे पाहावे लागेल.