WhatsApp चे नवे फिचर्स, जाणून घेऊयात या फिचर्सबद्दल!
व्हॉट्स अॅपचे यूझर्स या अॅपमध्ये येणाऱ्या नव्या अपडेट्ची उत्सुकतेने वाट पाहात असतात. व्हॉट्सअॅपच्या कंपनीने नुकतेच नवे फिचर्स या अॅपमध्ये अपडेट केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWeb media editor : कंप्यूटरवर व्हॉट्सअॅपचा वापर करत असताना जर तुम्हाला फोटो एडिट करायचा असेल व्हॉट्सअॅपच्या नव्या मीडिया एडिटर नावाच्या फिचरचा वापर तुम्ही करू शकता. व्हॉट्सअॅप वेब द्वारे कंप्यूटरमध्ये तुम्ही या फिचरचा वापर करू शकता.
Sticker Suggestions : चॅटिंग करताना अनेक लोक स्टिकरचा वापर करतात. वेगवेगळे स्टिकर शोधण्यासाठी व्हॉट्सअॅपने Sticker Suggestions हे नवे फिचर आणले आहे. चॅटिंग दरम्यान तुम्ही एकखादा मेसेज टाईप करून सर्च केला तर तुम्हाला त्या संबंधित स्टिकर व्हॉट्सअॅप सुचवेल. व्हॉट्सअॅप कंपनीचा असा दावा आहे की, Sticker Suggestions या फिचरला फीचर प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देवून बनवण्यात आले आहे.
Link Previews : लिंक प्रीव्ह्यू या व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरद्वारे तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत वेगवेगळ्या कंटेंटच्या लिंक शेअर करू शकता.
Payment Stickers : व्हॉट्सअॅपमध्ये पेमेंट स्टिकर हे नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. हे फिचर भारतातील पाच महिला कलाकारांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. हे फिचर यूझरला मनी ट्रान्सफर संदर्भात मदत करेल.
प्रायव्हसी फिचर होईल अपडेट WhatsApp च्या सर्व अपडेट्सकडे लक्ष देणारे WABetaInfo यांच्या मते, कंपनी व्हॉट्सअॅप वेबच्या एका बीटा व्हर्जनची टेस्टींग करत होते. या फिचरमध्ये प्रायव्हसी फिचर मिळणार आहे. रिपोर्टनुसार कंपनी व्हॉट्सअॅपवेबमध्ये मोबाईल अॅपचे लास्ट सिन (Last Seen), प्रोफाइल फोटो (Profile Photo), इन्फो About Info आणि Read Receipts हे फिचर्स अॅड करणार आहेत.