Twitter Data Leak : ट्विटरच्या सुरक्षेला सुरुंग, 200 मिलियन युजर्सची माहिती चोरीला
ट्विटरच्या सुरक्षेबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सची माहिती चोरल्याचा दावा करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विटर युजर्सची मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरवरून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
ट्विटरवरील युजर्सची माहिती मोठ्या प्रमाणात लीक झाल्यामुळे ट्विटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल यांनी लिंक्डइन पोस्ट करत म्हटले आहे की, 'फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डॉक्सिंग या घटनांमध्ये वाढ होईल.'
गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल पोस्ट करत माहिती दिली होती.
गॅल यांनी त्यावेळी सांगितलं होते की, 'मोठ्या प्रमाणात ट्विटर युजर्सची माहिती चोरीला जात आहे. ट्विटरने या समस्येची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.'
ट्विटर युजर्सची मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दुसऱ्या एका तज्ज्ञाकडून 200 दशलक्ष युजर्सची माहिती चोरीला गेल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
या प्रकरणात, हॅव आय बीन पॉन्ड या ब्रीच-नोटिफिकेशन साइटचे निर्माते ट्रॉय हंट यांनीही या रिपोर्टच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला आहे. ट्रॉय हंट यांनी म्हटलं आहे की, या रिपोर्टमधील दावा खरा आहे.
हंट यांनी लीक झालेला डेटा पाहिला आणि सांगितले की 'रिपोर्टमध्ये जे सांगण्यात आले ते खरं आहे. हॅकर्सने ऑनलाइन फोरमवर युजर्सच्या आयडीचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, या स्क्रीन शॉट्समध्ये त्याची ओळळ किंवा ठिकाण याचा उल्लेख नाही.'