Tips : मोबाईल चार्ज करताना 'या' गोष्टी टाळा, मोठी नुकसान टळेल

Feature_Photo_7

1/5
आपल्या दैनंदिन जीवनाचा बराच वेळ स्मार्टफोनसोबत जातो. कारण त्यानेआता बरीचशी कामे मोबाईलद्वारे होऊ लागली आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मार्टफोनची बॅटरी देखील वेगाने संपते त्यामुळे मोबाईलची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागते. परंतु स्मार्टफोन चुकीच्या मार्गाने चार्ज केल्याने बॅटरीचे नुकसान होते. त्यामुळे बॅटरी चार्ज करताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
2/5
काही लोकांना फोन चार्जिंगला लावून तसाच ठेवण्याची सवय असते. मात्र मोबाईलची बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यास तिचा स्फोट होण्याची शक्यता असते. तसेच फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो.
3/5
फोन कोणत्याही कंपनीचा असो कंपनी त्यासाठी खास चार्जर तयार करते. मात्र अनेकदा असं होतं की फोनला आपण कोणताही चार्जर लावतो. मात्र फोनला नेहमी कंपनीच्या ओरिजनल चार्जरनेच चार्जिंग करावी. डुप्लिकेट चार्जरने बॅटरी चार्ज केल्याल बॅटरी आणि फोन दोघांचे नुकसान होते.
4/5
फोन महाग असेल तर त्याचे प्रोटेक्शन करणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु बर्‍याच वेळा असं दिसतं की लोक आपल्या फोनच्या कव्हरसह चार्ज करतात. मात्र असं केल्यास बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फोन चार्ज करताना कव्हर काढून करत जा.
5/5
बर्‍याच वेळा लोक फोन चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरतात. तसेच लोक चार्जिंग दरम्यानही फोन वापरतात. मात्र असं केल्याने स्मार्टफोनचा परफॉर्मन्स आणि बॅटरी दोघांवरही परिणाम होतो.
Sponsored Links by Taboola